No Video Available
No Audio Available
मायेची जादू

संसाराचे द्वैत आणि चैतन्याचे अद्वैत हे एकाच ‘एका’चे वर्णन करणारे केवळ भिन्न शब्द आहेत.
तुम्हाला एखादी तरुणी किंवा वृद्ध स्त्री दिसते; पण ते चित्र तेच असते.
त्याच रेषा, तेच रंग आणि त्यांची तीच मांडणी; तरीही तुमच्या दृष्टिकोनामुळे तुम्हाला दिसणारे रूप बदलते.
हीच तर जादू आहे.
संसाराची रूपे आणि समाधीची निराकार अवस्था यात काहीच फरक नाही.
संसार हा ईश्वरी तत्त्वापासून वेगळा नाही; संसार हे ईश्वरी तत्त्वाचेच नृत्य आहे.
नृत्य आणि नर्तक एकच असतात, तसेच स्वप्न आणि स्वप्न पाहणाराही एकच असतात.
शब्दांचा वापर करू नका; तर्काचा आधार घेऊ नका.
ती जादू पहा; मग तुम्हाला प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येकात तोच दिसेल.
तो सर्वत्र आहे; अशी कोणती जागा आहे जिथे तो नाही?
मग तिथे ‘अहं’ला किंवा स्वतंत्र अस्तित्वाला जागाच कुठे उरते?
तुमच्या आणि ईश्वराच्या मध्ये केवळ एकच गोष्ट आहे: “तुम्ही स्वतः.”
जीवनातील ही जादू समजल्याने नम्रता येते आणि नम्रता अहंकाराचा नाश करते.
एकदा का हा भेद करणारा अहंकार नाहीसा झाला, की ‘एकात्मते’चा अनुभव येतो.
एकाच चित्रात जर आपण तरुणी आणि वृद्ध स्त्री यांना वेगळे मानले, तर तिथे द्वैताचा जन्म होतो आणि ती पूर्णपणे आपलीच चूक असते.
विश्वात आपल्याला दिसणारे द्वैत हे आपण स्वतः निर्माण केलेले असते; सत्य मात्र अद्वैतच असते.
पण जे द्वैत स्वरूपात दिसते ती ‘माया’ असते आणि आपण तिच्या मोहात पडतो.
माया हे चैतन्यच आहे आणि अद्वैत अवस्थाही चैतन्यच आहे.
आणि तीच तर खरी जादू आहे.
No Question and Answers Available